Hi,
My all Friends,
आपण जगभर पसरलेल्या संगणकाच्या जाळ्यात, यासंगणकावरील माहिती मिळविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल हार्दिक अभिनंदन!
आपलंआयुष्य सुखी समाधानी रहावं असा विचार फक्त मानवच करू शकतो. त्यासाठी त्याला आवश्यकअसते गुरुकिल्ली. एकदा का, गुरुकिल्ली गवसली की आयुष्यात अनेकानेक रगांची उधळण करूनत्याला टवटवीत ठेवणं माणसाला सोप जातं. पण ही गुरुकिल्ली सहज नाही ना सापडत.त्यासाठी आवश्यक असते स्वतःच्या चौकटीची माहिती. एकदा का स्वतःच्या चौकटीच्याकौशल्यांची, ज्ञानाची, आवडीची आणि पैलूंची जाणीव झाली की या चौकटीच्या कुलपाचीगुरूकिल्ली सापडणं सुकर होतं.
आपणास आपलं आयुष्य यशस्वी करण्यासाठी ज्ञान, कौशल्य, कला आणि उपलब्ध साधनांच्या मर्यादेत काय काय करता येईल, हे पाहण्यासाठीविविध पर्यांयांची एकत्रित माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न या संकेतस्थळाव्दारेकरीत आहोत. इत्थंभूत माहितीमधून आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठीच्या वयशस्वीतेच्या कुपीपर्यंत आपल्याला पोचता यावं म्हणून शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, महिलांसाठीच्या विविध योजना, व्यक्तिमत्त्व विकासाचे दीपस्तंभ इत्यादी विविधांगीमाहिती संकलित स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न.
महाराष्ट्रातील अधिकांश युवक-युवतींच्यामनातील मराठीवर असणारं मातृत्वाचं ममत्व ध्यानी घेऊन शक्य तेवढी व पुरेशी माहितीमुद्दामच मराठीत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्रत्येक उपक्रमातुनतळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करावा, बदलत्या कालानुरूप सातत्याने बदलणार्या गरजांचा मागोवा घेत हेसंकेतस्थळ सदोदीत नाविन्यपूर्ण ठेवण्याचा वसा आम्ही घेत आहोत. सर्वांगीणउपयोगीतेसाठी आपल्या सुचनादेखील आमच्यासाठी मौल्यवान आहेत. कृपया योग्य त्या सूचनाआपण आम्हास कराव्यात, हे विनम्र आवाहन.
आपण सारे मिळून येणार्या पिढीसाठी पथदर्शक कार्यकरूयात या विश्वासासह!
आपला
COMPUTER WORLD
CONTACT:-
Email are:-
At : COMPUTER-WORLD1